Home Breaking News इंजि.अश्विन कयापाक जिल्हा उपाध्यक्ष पदी

इंजि.अश्विन कयापाक जिल्हा उपाध्यक्ष पदी

33
0
यवतमाळ जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघ :नवनिर्वाचीत पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्रांचे वितरण
यवतमाळ : येथील जिल्हाध्यक्ष संपर्क कार्यालयात २ नोव्हेंबरला राष्ट्रवादी काँग्रेस पदवीधर संघाच्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती_पत्रे  देण्यात आली. यावेळी इंजि. अश्‍वीन कयापाक यांची जिल्हा उपाध्यक्षपदी वर्णी लागली. यावेळी माजी आमदार तथा जिल्हाध्यक्ष ख्वाजा बेग साहेब, प्रदेश सरचिटणीस नानाभाऊ गाडबैले, विवेकभाऊ देशमुख, महिला जिल्हाध्यक्षा क्रांतीताई राऊत, तालुकाध्यक्ष नरेशभाऊ ठाकूर, शहराध्यक्ष सतीशभाऊ मानधना, विधानसभा अध्यक्ष श्री. खांदवे साहेब, राजूभाऊ जॉन, हरिषभाऊ कुडे, योगेशभाऊ धानोरकर, जिल्हा चिटणीस स्वप्नील खोब्रागडे, जिल्हाध्यक्ष राष्ट्रवादी पदवीधर संघ अॅड.प्रशांत किर्दक यांच्या हस्ते नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
या निवडीत राष्ट्रवादी पदवीधर संघ यवतमाळ जिल्हा उपाध्यक्ष पदी इंजि.अश्विन कयापाक, जिल्हा सरचिटणीस पदी सुमित लांडगे, उमरखेड तालुका अध्यक्ष पदी नागेश कदम, उमरखेड शहर अध्यक्ष पदी प्रसाद गव्हाळे, उमरखेड महागाव विधानसभा अध्यक्ष पदी सुरज देशमुख, नेर तालुका अध्यक्ष पदी निखिल भेंडे, जिल्हा सरचिटणीस पदी प्रफुल्ल वडूरकर, कळंब तालुका अध्यक्ष पदी राहुल शेंडे,  सोशल मीडिया प्रतिनिधी पदी सुप्रीत गणवीर यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here