Home Breaking News यवतमाळ जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ...

यवतमाळ जिल्ह्यातील अवेळी पावसामुळे आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करुन तत्काळ निधी उपलब्ध करुन देण्याची वनमंत्री संजय राठोड यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी.

29
0
मुंबई दि. 10  : – यवतमाळ जिल्ह्यात सप्टेंबर व ऑक्टोंबर 2020 या कालावधीत झालेल्या अवेळी व सततच्या  पावसामुळे आणि बोंडअळीच्या प्रादुर्भावामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीच्या पंचनामे करुन नुकसान भरपाई देण्याबाबत वनमंत्री संजय राठोड यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना आज मंत्रालयात निवेदन दिले व नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याचे  महसूल प्रशासनाला आदेश द्यावेत व नुकसान भरपाई करीता निधी उपलब्ध करुन द्यावा अशी मागणी वनमंत्री तथा यवतमाळचे पालकमंत्री यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली.
यवतमाळ जिल्ह्यात माहे जुन ते ऑक्टोंबर 2020 या काळात अतिवृष्टी व पुरामुळे झालेल्या नुकसानीचा जिल्हास्तरीय अहवाल यापुर्वीच शासनास सादर करण्यात आला होता. परंतु माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर 2020 या कालावधीत काही मंडळांमध्ये 65 मि.मि. पेक्षा कमी पाऊस झालेला असतांना देखील मोठे नुकसान झाले होते. मात्र 65 मि.मि. पेक्षा कमी पाऊस झाल्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या समितीला संयुक्त पथकामार्फत पंचनामे करता येत नाहीत व त्यामुळे शासनाकडून पुढील आदेश मिळावेत अशी मागणी जिल्हाधिकारी यांनी शासनाकडे केली होती. तसेच यवतमाळ जिल्ह्यातुन शेतकऱ्यांनी याबाबत पंचनामे व्हावेत व निधी मिळावा अशी आग्रही मागणी पालकमंत्री संजय राठोड यांचेकडे वेळोवेळी केली होती.
                यवतमाळ जिल्ह्यात माहे सप्टेंबर व ऑक्टोंबर 2020 मध्ये अवेळी पडलेल्या संततधार पाऊसामुळे झालेल्या शेतपिकांच्या नुकसानीचे तसेच कापसावर बोंडअळीचा प्रादुर्भाव झाल्याने झालेल्या नुकसानीचे तत्काळ पंचनामे करण्याचे आदेश संबंधितांना द्यावेत याबाबत संजय राठोड, वन मंत्री तथा पालकमंत्री यांनी मुख्यमंत्री श्री.उध्दवजी ठाकरे यांचेसमवेत चर्चा केली व तसे निवेदन देऊन याबाबत नुकसान भरपाई करीता प्राथमिक अहवालाच्या आधारे जिल्हाधिकारी यांनी कळविल्याप्रमाणे 315 कोटी निधी उपलब्ध देण्यात यावा अशी आग्रही मागणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here