Home Breaking News जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजाराच्यावर रुग्ण कोरोनामुक्त ; 55 नव्याने पॉझेटिव्ह

जिल्ह्यात आतापर्यंत 10 हजाराच्यावर रुग्ण कोरोनामुक्त ; 55 नव्याने पॉझेटिव्ह

55
0

यवतमाळ: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव मार्च महिन्यात सुरू झाला. यवतमाळ जिल्हा सुरवातीपासूनच त्यात समाविष्ठ होता. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10746 पर्यंत पोहचली असली तरी जिल्ह्यात 10008 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी गेले आहेत. जिल्ह्याच्या नागरिकांसाठी व जिल्हा प्रशासनासाठी ही नक्कीच दिलासादायक बाब आहे.
गत 48 तासात जिल्ह्यात 139 जणांनी कोरोनावर मात केली असून 55 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर दोन जणांचा मृत्यु झाला. यात यवतमाळ शहरातील 45 वर्षीय पुरुष तसेच आणखी एकाचा समावेश आहे. वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 139 जणांनी गत दोन दिवसात कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली आहे.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 243 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 45 जण नव्याने पॉझेटिव्ह तर रविवारी प्राप्त 185 रिपोर्टपैकी 10 जण पॉझेटिव्ह आल्याने दोन दिवसात पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 55 ने वाढली. मात्र शनिवारी 75 आणि रविवारी 64 अशा एकूण 139 जणांनी कोरोनावर मात केली. जिल्ह्यात सद्यस्थितीत 282 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 10746 झाली आहे.
जिल्ह्यात सुरवातीपासून बरे झालेल्यांची एकूण संख्या 10008 असून आतापर्यंत 356 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 97006 नमुने पाठविले असून यापैकी 96842 प्राप्त तर 164 अप्राप्त आहेत. तसेच 86096 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here