Home Breaking News वीज बिल ग्राहक संघटनेतर्फे सरकारचा निषेध

वीज बिल ग्राहक संघटनेतर्फे सरकारचा निषेध

35
0

यवतमाळ : कोरोना काळातील थकीत वीज बिलाची वसुली करण्याचे आदेश महावितरणने दिले आहे. त्यामुळे सवलतीच्या आदेशावर असलेल्या वीज ग्राहकांना धक्का बसला आहे. कोरोना काळात वीज ग्राहकांना आलेल्या अव्वाच्या सव्वा वीजबिलातून सवलत मिळण्याची शक्यता मावळली आहे. महावितरणने त्याबाबतचा परिपत्रक जारी केले आहे. याचा निषेध व्यक्त करीत महाराष्ट्र वीज बिल ग्राहक संघटनेच्या कार्यकर्त्यांनी बुधवार, दि. १८ नोव्हेंबर रोजी महावितरण कार्यालयासमोर वीज बिलाची होळी करीत राज्य सरकारचा घोषणाबाजी करून निषेध केला.दरम्यान, राज्य सरकारने वीज बिल माफीसंदर्भात लवकर पाऊल उचलले नाही तर तीव्र आंदोलन करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष बापू दर्यापूरकर यांनी दिला.

तब्बल तीन-चार महिने कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे लॉक डाऊन करण्यात आले होते. अशातच तीन महिन्यांचे वीज बिल भरणा करायला ग्राहकांकडे पैसे नव्हते. देशातील इतर राज्यात लॉक डाऊन काळातील वीज बिल माफ करण्यात आले. उर्जा मंत्र्याने दिवाळी पर्यंतचे वीज बिल माफ होईल असे सांगितले होते. परंतु आता उर्जा मंत्री वीज बिल माफ देणे महावितरणला शक्य नसल्याचे सांगितले.

या निर्णयाचा निषेध करत वीज ग्राहक संघटनेच्या वतीने महावितरण कार्यालयासमोर राज्य सरकारच्या निषेधार्थ वीज बिलाची होळी करण्यात आली. यावेळी वीज ग्राहक संघटनेचे विदर्भ अध्यक्ष प्रशांत दर्यापूरकर, उपाध्यक्ष राजू जेकब, संघटनेचे दत्ता कुलकर्णी, अमोल देशमुख, सुहास सावरकर, अविनाश धन्यवाद, राधेश्याम निमोदिया, मोहन रीनाइत, अशोक भुतडा, सिकंदर शहा, अनिल हमदापुरे, देवा शिवरामवार, आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here