Home Breaking News निराधारांना मायेचा आधार

निराधारांना मायेचा आधार

84
0
पुसद येथील ‘माणूसकीची भिंत‘च्या सदस्यांचा कौतुकास्पद उपक्रम
पुसद :मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. आपण समाजाचे काही देणे लागतो ही भावना विसरून तो स्वार्थी व आत्मकेंद्री झाला आहे. तो भौतिक सुखात समाधान शोधतो परंतु ते मिळत नाही. महापुरुषांनी व संतांनी रंजल्या-गांजल्या आर्थिक दुर्बल अनाथ वंचितांना मायेचा आधार देऊन त्यांच्या निष्काम सेवेतच सुखाची प्राप्ती सांगितली आहे. माणुसकीची भिंतीचे सदस्य ही सामाजिक भावना जपून मागील चार वर्षांपासून गोरगरीब गरजू अनाथ लोकांसाठी मदतीचे कार्य करत आहे.
माणुसकीची भिंतच्या वतीने गोरगरिबांना दररोज कपडे व अन्नदान करून व इतर उपयोगी वस्तू देऊन सदस्य मदत करत असतात. उपजिल्हा रुग्णालयात मदत केंद्रावर रुग्णांना व त्यांच्यासोबत असलेल्या नातेवाईकांना दररोज अन्नदान करतात. निराधार लोकांसोबत सण साजरे करत असतात.
दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी हा सण माणुसकीची भिंततर्फे शनी मंदिर येथे मोठ्या आनंदाने गोरगरीब व निराधार लोकांसोबत साजरा करण्यात आला. निराधार पुरुषांची दाढी व कटिंग करण्यात आली. त्यांना नवीन कपडे देऊन दिवाळीच्या भेटवस्तू देऊन जेवन देण्यात आले. महिलांना नवीन साड्या मुलांना व मुलींना कपडे देण्यात आले. त्यांना दिवाळीच्या शुभेच्छा देऊन दिवाळीचा सण साजरा करण्यात आला. निराधारांच्या चेहऱ्यावरील प्रसन्नता समाधान देऊन जाते. अन्नदानाची खर्च दीपावली निमित्त रामबहादूर कीर्ती सिंह रावल पुणे यांनी दिला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रभाकर टेटर, सुशांत महल्ले, पंकज पाल, मधुकर चव्हाण, यशवंत देशमुख, गोपाल सुरोशे, दत्तात्रय जाधव, सचिन भिताडे, बंडू भुसाळे, अभिमन्यू चोपडे, सुनील टाक, बंटी टाक, अशोक गायकवाड, संतोष गायकवाड, स्वाती वाथ उपस्थित होते.
माणुसकीच्या भिंतचे अध्यक्ष गजानन जाधव यांनी पुसद वासीयांना दिवाळी व इतर कुठलाही सण गरजूंना भेटवस्तू व जेवण देऊन साजरा करण्याचे आवाहन केले. यावेळी माणुसकीच्या भिंतीचे सचिव जगत रावल, प्रसिद्धी प्रमुख संतोष गावंडे, उपाध्यक्ष मधुकर वाळूकर, आदित्य जाधव, दीपक घाडगे, मोनिका जाधव, मोना जगत, रावल, निर्मला रावल, शीला वानखडे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here