Home Breaking News २५ वर्षांपासून नागरिकांना मुलभूत सुविधाच नाही

२५ वर्षांपासून नागरिकांना मुलभूत सुविधाच नाही

94
0
राळेगाव येथील प्रभाग १३मधील रहिवाशांना मालकीहक्क पट्टे नावाने, सोयीसुविधा पुरविण्याबाबत ग्रामविकासमंत्र्यांना निवेदनातून साकडे
राळेगाव : येथील प्रभाग क्रमांक १३ मधील रहिवाशांना गेल्या २५-२७ वर्षापासुन अतिक्रमण करून घरे बांधुन राहत असलेल्या नागरिकांना अद्यापपावेतो जागेचा मालकी हक्काचा पट्टा  नावाने मिळालेला नाही. परिणामी, त्यांना शासनाच्या कुठल्याही योजनेचा लाभ मिळालेला नाही. याबाबत त्यांनी तहसील कार्यालयाचे उंबरठे झिजविले परंतु, यश आले नाही. आजपर्यंत कुठलीच कारवाई करण्यात आली नसल्याने येथील रहिवाशांनी थेट ग्रामविकास मंत्र्यांना २० नोव्‍हेंबरला निवेदन देण्यात तातडिने मुलभूत सोयीसुविधा व मालकी हक्काचा पट्टा नावाने मिळण्याची मागणी केली आहे.
राळेगाव येथील प्रभाग क्र. १३मधील नागरिकांना घरकुल, नळ कनेक्शन, विद्युत पुरवठा या अनेक योजनेपासुन आम्हाला वंचीत राहावे लागत आहे. राहत असलेल्या प्रभाग क्रमांक १३ मध्ये सांडपाणी निघणेकरीता नाल्या नाही, स्ट्रीट लाईट नाही, रहदारीकरीता रोड नाही अश्या अनेक समस्या आहे. परिणामी नागरिकांना राहणे अवघड होत आहे. अशात कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव लक्षात रोगराई उद्भवण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने तातडिने मुलभूत सुविधा पुरविण्याची मागणी देखील करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here