Home Breaking News रस्ता,  नालीच्या दुरावस्थेने वाढविली नागरिकांची धाकधूक

रस्ता,  नालीच्या दुरावस्थेने वाढविली नागरिकांची धाकधूक

178
0
अपघाताची शक्यता, नगर पालिका मुख्याधिकाऱ्यांना निवेदन
यवतमाळ : शहरात गेल्या वर्षभरांपासून विकासकामांच्या नावांवर चांगले रस्ते फोडण्याचा प्रताप अनेक कंपन्यांकडून करण्यात आला आहे. शहरातील अनेक चांगले रस्ते खोदकाम करणे आणि परत बुजविणे हे यवतमाळवासींसाठी नित्याचेच झाले आहे. कधी ४जी, ५जी नेटवर्कसाठी, बेंबळा अमृत जलवाहिनीसाठी, तर कधी मजीप्रातर्फे मात्र या रस्त्यावर खड्यांची चाळणी झाली आहे. रस्त्याची दुरूस्ती करण्यात आली नाही. परिणामी, अनेकांचे अपघातदेखील घडले आहे. येथील नागरिकांनी रखडलेले काम व सिमेंट पाईप काढूण टाकण्याची मागणी मुख्याधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे.
स्थानिक- प्रभाग क्र १७ मधील शिवाजी नगरमधील जगताप यांच्या घराजवळील रस्त्यावर नालीचा सिमेंट पाईप वर आला आहे. मागील वर्षी नळाच्या पाईप लाईनचे काम करण्याकरिता हा रस्ता खोदण्यात आला होता.  व काम झाल्यावर खोदलेल्या रस्त्यावर अर्धवट माती टाकण्यात आली. त्यामुळे या मार्गावरील रस्ता खराब झाल्यामुळे नालीचा सिमेंट पाईप रस्त्याच्या वर आला असुन येथे अपघात होण्याचा धोका निर्माण झाला असून येथे चार रस्ते जोडल्या गेल्यामुळे वाहतूकीची कोंडी होत आहे. तसेच मागे नामांकित रुग्णालय असल्याने रूग्णांची येणे-जाणे सूरु असल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण झाला आहे. नालीचा पाईप काढून टाकावा, रस्त्याची लेवल करून सिमेंट पाईप वर डांबरीकरण करण्याची मागणी नगरपालिकेचे मुख्यधिकाऱ्यांना करण्यात आली आहे. प्रभाग क्र १७ नगरसेवक चंदुभाऊ चौधरी यांना निवेदनाची माहिती देण्यात आली.. निवेदन देतांना अंकुश पांडे, बंटी श्रीवास, अनुप खोडवे आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here