Home Breaking News जिल्ह्यात दोघांचा मृत्यु तर 22 नव्याने पॉझेटिव्ह

जिल्ह्यात दोघांचा मृत्यु तर 22 नव्याने पॉझेटिव्ह

114
0
20 जण कोरोनामुक्त
यवतमाळ, दि. 23 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला असून 22 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 20 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
मृतकांमध्ये यवमताळ शहरातील 70 वर्षीय आणि राळेगाव शहरातील 75 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 1359 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 22 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1337 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 326 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11062 झाली आहे.
24 तासात 20 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10370 आहे. तर जिल्ह्यात एकूण 366 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 104932 नमुने पाठविले असून यापैकी 102956 प्राप्त तर 1976 अप्राप्त आहेत. तसेच 91894 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here