Home Breaking News ऍड. अभिजित बायस्कर शिवसेना जिल्हा संघटक पदी

ऍड. अभिजित बायस्कर शिवसेना जिल्हा संघटक पदी

77
0

विधी व न्याय विभागाची जबाबदरी

स्थानिक बाळकृष्ण मंगलकार्यालात शिवसेना यवतमाळ जिल्ह्याचा दीपावली स्नेह मिलन सोहळा नुकताच पार पडला.ह्या मेळाव्यात शिवसेना प्रणित विविध संघटनांची व विभागांची स्थापना करण्यात आली.शिवसेना पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व शिवसेना पश्चिम विदर्भ समन्वयक अरविंद नेरकर यांचे मान्यतेने शिवसेनेच्या विधी व न्याय विभागाच्या जिल्हा संघटक पदी यवतमाळ शहरातील सुप्रसिद्ध विधिज्ञ ऍड अभिजित बायस्कर यांची नियुक्ती करण्यात आली.महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांचे हस्ते ऍड.अभिजित बायस्कर यांना नियुक्ती पत्र व शिवसेनेचा मानाचा भगवा शेला देण्यात आला.
ऍड अभिजित बायस्कर यांचेकडे शिवसेनेच्या विधी व न्याय विभागाची राळेगाव,यवतमाळ,दिग्रस,पुसद व उमरखेड विधानसभांची जबादारी देण्यात आली आहे. शिवसेना यवतमाळ जिल्ह्याची कायद्याची बाजू सांभाळण्याची जबादारी ऍड अभिजित बायस्कर यांचेकडे देण्यात आली आहे.ह्या नियुक्ती बद्दल शिवसेना जिल्हा प्रमुख राजेंद्र गायकवाड,जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,श्याम थोरात,शलेंद्र तांबे,राजू राऊत,राहुल गंभिरे,अमोल धोपेकर,अनिल यादव,निलेश बेलोकर,अभिनव वाडगुरे यांनी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी अभिनंदन केले आहे.
सोबत अभिजित बायस्कर यांचा फोटो
शिवसेना विधी व न्याय विभागाची न्याय्य गरज पटवून देऊन दैनंदिन सामाजिक जीवनातील कायद्याचे महत्व लक्षात घेता पक्ष प्रमुख मुख्यमंत्री उद्धवसाहेब ठाकरे,मा अरविंद नेरकर साहेब व यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री ना संजय राठोड,शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे, राजेंद्र गायकवाड यांनी माझेवर मोठी जबाबदारी दिली आहे.यवतमाळ जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात शिवसेनेच्या विधी व न्याय विभागाची शाखा उघडण्याचा व लवकरच जिल्ह्याचा व्यापक दौरा करून प्रत्येक तालुक्याची शिवसेना विधी व न्याय शाखेशी घट्ट बांधणी करण्याचा माझा मानस आहे.
ऍड अभिजित बायस्कर
जिल्हा संघटक
शिवसेना विधी व न्याय विभाग
यवतमाळ जिल्हा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here