Home Breaking News विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे : जावेद अंसारी

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केलेले आरोप बिनबुडाचे : जावेद अंसारी

19
0
यवतमाळ : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आमदार प्रवीण दरेकर हे यवतमाळ जिल्हा दौ-यावर आले असता त्यांनी उमरखेड आणि यवतमाळात पत्रकार परिषद घेवून राज्यातील महाविकास आघाडी सरकार वर जे आरोप केले ते सर्व आरोप बिनबुडाचे असल्याची प्रतिक्रीया काँग्रेसचे नेते आणि न.प. चे जेष्ठ नगरसेवक जावेद परवेज अंसारी यांनी दिली आहे.
राज्यातील महाविकास आघाडी सरकारला लवकरच एक वर्ष पुर्ण होईल, या एक वर्षात महाविकास आघाडी सरकारमध्ये सहभागी असलेले कांग्रेस शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्र पक्षांनी चांगला समन्वय साधून शेतकरी, सामान्य जनतेच्या हितासाठी योग्य निर्णय घेतले. जनतेला दिलेले वचन पुर्ण करण्याकरीता महाविकास आघाडीचे सरकार मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वात प्रयत्नशिल असल्याचेही जावेद परवेज अंसारी यांनी सांगीतले. विरोधी पक्षनेता प्रविण दरेकर यांनी महाविकास आघाडी सरकारबाबत केलेल्या वक्तव्याचा चांगलाच समाचार जावेद अंसारी यांनी घेतला. केंद्रामध्ये भाजपची सरकार आहे. परंतु देशभरातील बेरोजगार, किसान, गरीब,मजदूर, छोटे व्यापारी विरोधात निर्णय घेतले जात आहेत. राज्यातही भाजपची सरकार होती होती राज्यातील शेतकरी, गरीब, बेरोजगारांकरीता कसलेही विशेष कार्य भाजप सरकारकडून करण्यात आले नसल्याचा आरोप जावेद अंसारी यांनी केला आहे.उत्तर प्रदेश मध्य महिलाना सुरक्षा देण्यात असमर्थ राज्याचे विरोधी पक्षनेते पद असलेल्या प्रविण दरेकर यांनी यवतमाळात येवून जे राज्यातील आघाडी सरकारबद्दल जे बेजवाबदार वक्तव्य केले ते अशोभनिय असल्याचे मत जावेद परवेज अंसारी यांनी व्यक्त केले. त्यांच्या या वक्तव्याचा निषेधही त्यांनी केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here