Home Breaking News सत्य साई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधानदिनानिमित्त कार्यक्रम

सत्य साई इंग्लिश मिडियम स्कूलमध्ये संविधानदिनानिमित्त कार्यक्रम

42
0
यवतमाळ : भारतीय संविधान हे इतर देशाच्या संविधाच्या तुलनेत खुप महान आहे.  या संविधानात नैतीक मुल्ये, लोकशाही, समता, बंधूता, मार्गदर्शक तत्वे आदींचा समावेश आहे. भारतीय संविधान इतर देशासाठी प्रेरणादायी आहे व याची अंमलबजावणी व्‍हावी, असे प्रतिपादन शिक्षक सुरज जयस्वाल यांनी व्‍यक्त केले. ते येथील सत्य साई इंग्लिश मिडियम स्कूलमधील आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्याध्यापिका  शितल तिखीले, गौरव ढुमणे, योगिता येडके, अर्चना सुने, सौ. पराळे, सौ. शेंडे आदींची उपस्थिती होती. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करुन अभिवादन करण्यात आले. दरम्यान, प्रास्ताविकेचे वाचन करण्यात आले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here