Home Breaking News दोन कंटेनरचा विचित्र अपघात

दोन कंटेनरचा विचित्र अपघात

22
0
पांढरकवडा शहरातील घटना, सुदैवाने जिवीत हानी नाही
पांढरकवडा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ४४ वरील वाय पॉईंट पांढरकवडाजवळ कंटेनरची समोरासमोर जबर धडक होऊन एक कंटेनर चालक जखमी झाला. ही घटना बुधवारी २५ नोव्हेंबरला दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली.
पांढरकवडा शहरातील वाय पॉईंट राष्ट्रीय महामार्गावर भरधाव वेगाने जाणाऱ्या कंटेनर आणि समोरील कंटेनर यांच्यात समोरासमोर जोरदार धडक बसली. या अपघातात सुदैवाने कुठलीही जिवित हानी झाली नसून एक कंटेनर चालक गंभीर जखमी झाला आहे. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी धाव घेवून जखमींना तातडीने पांढरकवडा उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल केले. या अपघातात दोन्ही कंटेनरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेता पांढरकवडा पोलिसांनी घटनास्थळी जावून पाहणी केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here