Home Breaking News सरकारविरोधात कर्मचा-यांची एकजूट

सरकारविरोधात कर्मचा-यांची एकजूट

26
0
विविध मागण्यांकडे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी संप, कर्मचा-यांचा प्रतिसाद
यवतमाळ :– राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नेतृत्वात केंद्र व राज्य सरकारी कर्मचारी, बँक,एलआयसी, सार्वजनिक क्षेत्र, जिल्हा परिषद महासंघ,ग्राम सेवक, असंघटीत कामगारांचा संप पुकारण्यात आला होता. कामगार कायद्यातील जिवघेण्या सुधारणा, जुनी पेन्शन योजना सर्वांना लागु करणे, खाजगी करणाचा विरोध, कंत्राटी करणाचा विरोध, शेतकरी विरोधातील कायदे, बेरोजगारांना दरमाहा 7500 बेकारी भत्ता, गोर गरिबाला प्रती व्यक्ती 10 किलो धान्य देणे, सर्व संवर्गाची रिक्त पदे भरणे इत्यादी प्रमुख मागन्याकडे शासनाचे लक्ष वेधन्यासाठी या देशव्यापी संपाचे आयोजन होते.
कोरोनाच्या पार्श्वभुमीमुळे मोर्चाचे आयोजन टाळण्यात आले. या शिवाय आझाद मैदानात एकत्र येण्याची परवानगी देण्यात न आल्याने कर्मचा-यांनी आपापल्या कार्यालयांसमोर ठिय्या देऊन हा संप यशस्वी केला. तर तालुकास्तरावरील कर्मचा-यांनी तालुक्याचे ठिकाणी संप यशस्वी केला. आजच्या संपामुळे शहर व तालुकास्तरावरील शासकीय कार्यालये ओस पडली होती. जिल्हा परिषद, प्राथमीक शिक्षक, पदविधर शिक्षक,जुनी पेन्शन हक्क संघटना व इतर संघटनांनी जिल्हा परिषदेच्या आवारात संप यशस्वी केला.
आजच्या सभेत जिल्हाध्यक्ष मंगेश वैध, किशोर पोहोनकर, नरेंद्र राऊत,विजय ठाकरे,दिवाकर राऊत, संजय भालेराव, सुनिल बुरांडे, प्रमोद पोहोकार, गजानन टाके,एन.पी.ढेकळे,शरद निबुदे,सुभाष वानरे, चंद्रशेखर भोयर, शोभाताई खेडसे, ज्ञानेश्वर नाकाडे, विनोद बोरघाटे, जि.के.मेसराम,राजेंद्र गावंडे,अजय मिश्रा,मंगला ठाकरे, गोपाल शेलोकार,आशिष जयसिंगपुरे, गोपाल गायकवाड, धिरज डाखरे, शाम मॅडमवार, अनिल राजगुरे, प्रमोद गुल्हाणे कैलास निमकर,नितीन जिचकार, अनुप भगत, स्वप्नील पानोडे,संतोष देवतळे, निलेश वाढई, आनंद कपिले, प्रदिप राठोड, वैभव पवार, रवि चव्हाण, प्रविण नाईकवाड, महेंद्र कटनकर, प्रविण शिंदे, नरु उके, बी.बी. मस्के, शंकर मडावी, दिलीप कोहळे, कांचन देडे, अम.ता केनेकर इत्यादी पदाधीकारी उपस्थीत होते.
केंद्र व राज्य सरकारने कामगार व कर्मचा-यांच्या विरोधात आयोजीत देशव्यापी संप 100 टक्के यशस्वी झाला असून संपाच्या पुर्व संध्येला शासनाने कारवाईचा इशारा देऊनही त्याचा कोणताही परीणाम संपावर झाला नाही.
– नंदकुमार बुटे, राज्य उपाध्यक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here