Home Breaking News वाढीव विजबिल विरोधात मनसे आक्रमक

वाढीव विजबिल विरोधात मनसे आक्रमक

24
0
सरकारच्या धोरणाविरोधात रोष
यवतमाळ : कोरोना काळात अत्यंत वाईट परिस्थतीत आपला उदरनिर्वाह करणाऱ्या जनतेचे कंबरडे मोडणाऱ्या आणि वाढीव वीजबिल देऊन आपला शब्द फिरवणाऱ्या या शासनाचा निषेध नोंदविण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेना जिल्हा यवतमाळच्या वतीने २६ नोव्‍हेंबरला स्थानिक टिळक स्मारक येथून धडक मोर्चाचे आयोजन करण्यात आले. मोर्चाचे नेतृत्व राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ येम्बडवार, जिल्हाध्यक्ष देवा शिवरामवार, अनिल हमदापुरे यांनी केले.
कोरोना काळात अनेक युवक बेरोजगार झालेत. अनेक उद्योगधंदे बंद पडले अशा परिस्थिती हे वाढीवविजबिल भरायचे कुठून असा सवाल सर्व सामान्य नागरिक विचारत आहे. अगोदर शासनाने या विजबिलाचा विचार करण्यात येऊन सर्वसामान्य जनतेतेला दिलासा देण्यात येईल असा शब्द दिला आणि आता त्याहून फिरत हे बिल भरावेच लागेल असा फतवा काढला. मनसेचा हा मोर्चा सर्वसामान्य जनतेच्या प्रश्नावर होता. मोर्चात जिल्ह्यातील मनसे कार्यकर्त्यांसोबतच सामान्य नागरिक महिलांनी सुद्धा सहभाग नोंदविला.  काळ्या फीत लावुन निषेध व्यक्त केला. या वेळी शासनाच्या विरोधात प्रचंड नारेबाजी मोर्च्या दरम्यान करण्यात आली. शहरातून मार्गक्रमण करत मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय येथे धडकला. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देतांना राज्य उपाध्यक्ष आनंदभाऊ येम्बडवार, जिल्हाध्यक्ष  देवा शिवरामवार, मनविसे जिल्हाध्यक्ष अनिल हमदापुरे, अभय गडम, सादिक शेख, अमित बदनोरे, डेविड शहाणे, विकास पवार,नगरसेवक गजु भालेकर,शंकर वरघट, धनंजय त्र्यंबके, यांचा समावेश होता. या मोर्च्यात प्रामुख्याने महिला आघाडी जिल्हाध्यक्ष संगीता घोडमारे, बाळू कठाळे, संतोष रोंगे, सुनील चव्हाण, सचिन येलगंधेवार, अक्षय देशमुख, संदीप लांडे, हेमंत खंगार, सुधाकर झोटिंग,प्रदीप तडसकर,तृषाल गबराणी,लकी सोमकुवर,मयूर जुमळे,गोपाळ चव्हाण,नंदू नेहारे,बबलू मसराम, मयूर मेश्राम,परीक्षित राणे,मनोज झोपटे, दिपक आडे,हरीश कामारकर,सुनील तायडे,विलास बट्टावार,पराग बारले, शेख तौसिफ, विनोद दोंदल यासह मोठ्या प्रमाणात मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here