Home Breaking News जिल्ह्यात 52 नव्याने पॉझिटिव्ह ; 37 जण बरे

जिल्ह्यात 52 नव्याने पॉझिटिव्ह ; 37 जण बरे

98
0

 एकाचा मृत्यू
यवतमाळ, दि. 28 : गत 24 तासात जिल्ह्यात 52 जण नव्याने पॉझिटिव्ह आले असून एकाचा मृत्यु झाला आहे. मृतकामध्ये वणी शहरातील 60 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 37 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार शनिवारी एकूण 693 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 52 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 641 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. जिल्ह्यात सद्यस्थितीत 483 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11434 झाली आहे. 24 तासात 37 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 10580 आहे. तर जिल्ह्यात एकूण 371 मृत्युची नोंद आहे. सुरवातीपासून आतापर्यंत 110747 नमुने पाठविले असून यापैकी 110026 प्राप्त तर 721 अप्राप्त आहेत. तसेच 98592 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here