Home Breaking News नाम तूझे घेता देवा होई समाधान…दहीसावळी बनली भक्तीमय

नाम तूझे घेता देवा होई समाधान…दहीसावळी बनली भक्तीमय

84
0
विविध कार्यक्रमाने भक्त झाले तल्लीन
दहिसावळी : भगवंताच्या नामस्मरणाने ईश्‍वर प्राप्ती होते, असे म्हटल्या जाते. हरीपाठ, भजन, किर्तन हे याचे उदाहरण आहे. महाराष्ट्र संतांची भूमी असून येथे अनेक संतांचा इतिहास लाभला आहे. अनेक भक्तांना भगवंतांची प्राप्ती झाल्याचे अनेक दाखले भक्तांकडून दिल्या जाते. अशाच एका गावात संत बाळू मामाची पालखी क्र. १३ येताच तेथील संपूर्ण वातावरण भक्तीमय बनले आहे. शिवाय, दररोज हजारो भाविकांची उपस्थिती आहे. विविध कार्यक्रमांचे आयोजन ग्रामस्थांतर्फे करण्यात आले आहे.
महागाव तालुक्यात असलेले दहिसावळी तसे जेमतेम पाच हजार लोकवस्तीचे गाव. ग्रामीण भागात येत असलेल्या या गावातील अनेक नागरिकांचे रोजमजुरी, शेतमजूरी करुन जगणे हाच नित्य दिनक्रम. या गावी संत बाळू मामाची पालखी क्र 13 आल्याने या गावासह परिसरातील वातावरण भक्तीमय झाले आहे. विविध कार्यक्रमातून भगवंताचे नामस्मरण केले जात आहे. अनेक भक्त या नामस्मरणात दंग होत आहे. याशिवाय रोज सकाळी 9 व रात्री 9 ला बाळू मामाचे आरती करण्यात येते. आलेल्या सर्व भक्तांना महाप्रसाद दिला जातो. रोज हजारोच्या संख्येने भाविक भक्त दर्शनासाठी येतात. आपल्या ईच्छा शक्तीने भक्त सेवा देतात कोणी बाळू मामाच्या मेंढ्या चारतात तर कोणी साफसफाई करतात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here