Home Breaking News माजी आमदार किर्ती गांधी, अनिल पांडे पहेलवान यांचा सत्कार

माजी आमदार किर्ती गांधी, अनिल पांडे पहेलवान यांचा सत्कार

64
0
यवतमाळ : माजी आमदार किर्ती गांधी यांची वेस्टर्न इंडिया कोरुगेटेड बॉक्स मॅन्युफॅक्चरर असोसिएशनच्या (विक्मा) अध्यक्षपदी सलग दुस-यांदा बिनविरोध निवड करण्यात आल्याने त्यांचा सत्कार किशोर दर्डा यांच्या हस्ते १डिसेंबरला करण्यात आला. शिवाय, अनिल पांडे पहेलवान यांची महाराष्ट्र राज्य कुस्तीगिर परिषदेच्या विभागीय सचिव पदी निवड झाल्याबद्दल येथील हनुमान आखाडामध्ये माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष बाळासाहेब मांगुळकर उपस्थित होते. या निवडीचे प्रभाकर गटलेवार, कुलभूषण तिवारी, रामेश्‍वर यादव, अनंता जोशी, प्रताप पारसरकर, दिपक ठाकूर, सुरेश जयसिंगपूरे, विठ्ठलराव भोयर, रवींद्र ढोक, आनंद जाधव, गोविंद कट्यारमल, कादिरभाई मिर्झा, हिरा मिर्षा आदींनी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here