Home Breaking News शेतक-यांच्या जिवावर उठलेली जुलमी कायदे रद्द करा

शेतक-यांच्या जिवावर उठलेली जुलमी कायदे रद्द करा

53
0
धरणे आंदोलन : यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीची राष्ट्रपतींना निवेदनातून मागणी
यवतमाळ : केंद्र सरकारने लादलेल्या जुलमी कायद्या विरोधात देशभरातील शेतकऱ्यांमध्ये तीव्र संताप आहे. या कायद्या विरोधात संपूर्ण देशातला शेतकरी एकवटला आहे. तसेच हे जाचक कायदे रद्द करावे, या मागणीसाठी देशातील शेतकरी दिल्लीत पोहोचला असून मागण्या मान्य होईपर्यंत मागे हटणार नसल्याचे दिसून येत आहे. या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस पक्षाचा पाठींबा दर्शविण्यासाठी यवतमाळ जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने गुरुवार ता. ३ रोजी यवतमाळ येथील आझाद मैदानात जिल्हा काँग्रेसतर्फे धरणे आंदोलन करण्यात आले.
शेतकरी विरोधी काळे कायदे रद्द व्‍हावे करीता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने २ महिन्यांपासून सातत्याने विविध आंदोलने करण्यात आली आहे. किसान व्‍हर्च्युअल महामेळावा, किसान हक्क दिवस, जिल्ह्या जिल्ह्यात धरणे आंदोलन, राजभवनावर पदयात्रा काढून राज्यपालांना निवेदन दिली. महामहिम, भाजप सरकारच्या या शेतकरी विरोधी कायद्याच्या विरोधोत संपूर्ण देशातील शेतकरी दिल्ली येथे एकवटला आहे. शेतकऱ्यांचे शोषण करणारा, शेतकरी विरोधी कायदा रद्द करण्याची मागणी दिलेल्या निवेदनातून करण्यात आली आहे. या आंदोलनात माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे,वसंतराव पुरके, आ. वजाहत मिर्झा, बाळासाहेब मांगुळकर, प्रवीण देशमुख, देवानंद पवार, प्रदीप डंभारे, चंदू चौधरी, उमेश इंगळे, घनश्‍याम अत्रे, जितेश नावडे, ओम फुटाणे, सुभाष यादव, विलास देशपांडे, अतुल भुराणे, विक्की राऊत, अतुल राऊत,अरुण ठाकूर, जफर खान, शब्बीर खान, उषा दिवटे, पल्लवी रामटेके, बबलु देशमुख, दर्शना इंगोले, गुड्डू जवादे, राजू गिरी, अजय किन्हिकर, अरविंद फुटाणे, अजय मट्रैकर, अनिल चावरे, आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here