Home Breaking News ‘बाळासाहेबां’च्या वाढदिवशी असाही एक उपक्रम…

‘बाळासाहेबां’च्या वाढदिवशी असाही एक उपक्रम…

78
0

मास्कविना शहरात फिरणाऱ्यांना मास्क देऊन सत्कार; जितेश नावडे मित्र मंडळाचा उपक्रम

यवतमाळ, ता. 4 : ‘बाळासाहेब मांगुळकर’ हे नाव म्हणजे माणूसकी जपणारं व्यक्तीमत्व. काळाची पाऊले ओळखणारा ध्येयवेडा माणूस. एक कुशल प्रशासक, व्यवस्थापक, रंजल्या, गांजल्यांना माणूसकीचा हात देणारा समाजसेवक. मातीशी नाळ जुडलेला माणूस. कदाचित ही ओळख अपुरी असेल एवढ्या उंचीवर आज ते आहेत. त्यांनी राजकीय क्षेत्रात शून्यातून विश्व निर्माण केले आहे. ही अत्यंत गौरवाची बाब आहे. 04 डिसेंबरला  त्यांचा वाढदिवस. समाजात  बाळासाहेबांच्या कार्यांना उजाळा मिळावा, यासाठी शहरातील जितेश नावडे यांना भन्नाट कल्पना सुचली. कोरोनाचा वाढता प्रादूर्भाव व दुसरी लाट असतांनाही नागरिक अक्षरश: प्रशासनाच्या नियमांकडे दुर्लक्ष करीत आहेत. प्रशासन कार्यतत्पर असूनही अनेक नागरिक विनामास्क शहरात फिरतांना आढळत आहेत. अशा नागरिकांचा गुलाबपुष्प देऊन त्यांचा सत्कार व मास्क वितरीत करण्यात आले. अशा नागरिकांना प्रशासनाच्या नियमाची आठवण करून देणे, हा त्या मागचा हेतू होता.
गेल्या सहा महिन्यापासून कोरोनाने हाहाकार माजविला आहे. देशातच नव्हे तर पूर्ण जगात लाखो-करोडो नागरिकांचा बळी कोरोनाने घेतलेला आहे. अनेक देशाची आर्थिक व्यवस्था देखील ढासळून निघाली आहे. अनेक हातांचा रोजगार गेला. इतका भयंकर परिणाम करणा-या  कोरोनाला अनेक नागरिकांनी हलक्यात घेतले आहे. गेल्या तीन महिन्यांच्या तुलनेत जिल्ह्यातील रुग्णसंख्या दिवसेंदिवस कमी होत असल्याने नागरिक बेजबाबदारपणे विनामास्क फिरतांना आढळून येत आहे. शहरात दिवाळीमध्ये तर खरेदीसाठी अक्षरश: चिक्कार गर्दी आढळून आली, याच पार्श्वभूमीवर बाळासाहेब मांगुळकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वायफळ खर्च न करता शहरातील जितेश नावडे मित्र परिवारातर्फे  काही तरी वेगळे करण्याची भन्नाट कल्पना सूचली. शहरातील दाते कॉलेज, माईंदे चौक या मार्गावर विनामास्क फिरणाऱ्या नागरिकांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले व त्यांना मास्क देण्यात आले. अशा आगळ्या-वेगळ्या उपक्रमामूळे त्यांना नियमांची आठवण झाली. यानंतर मास्क घालूनच कामे करू, अशी ग्वाही त्यांनी दिली. या आगळ्यावेगळ्या उपक्रमाचे नागरिकांतून कौतुक करण्यात आले. या उपक्रमात जितेश नावडे यांच्यासह राजू गिरी , सतीश बाळबुधे, सचिन झिटे, प्रेम वसरीकर, नईम पहेलवान, दत्ता हाडके, संतोष कांबळे, अजय मैत्रेयकर आदी पदाधिकारी-कार्यकर्ते उपस्थित होते.
वृक्षारोपणासह संगोपन करण्याची शपथ
दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे. ओझोन वायुचा थर कमी होत असल्याने तापमानात दिवसेंदिवस वाढ होत आहे. वृक्षारोपण करणे ही काळाची गरज आहे. हाच हेतू लक्षात घेत जितेश नावडे मित्र मंडळातर्फे वृक्षारोपण कार्यक्रम घेण्यात आला. यात वड, पिंपळ, निंब, चिंच, गुलमोहर, आंबा आदी वृक्ष लावून त्यांचे संगोपन करण्याचा निर्धार करण्यात आला.
दंडालाही नागरिक ‘ऐके ना’
शहरातील अनेक मैदानात सकाळच्या सुमारास नागरिक मॉर्निंग वॉकला विनामास्क फिरतांना आढळून येत आहेत. प्रशासनातर्फे ५०० रुपयांचा दंड ठेऊनही अनेक नागरिक या नियमाला जुमानत नसल्याचे दिसून येत आहे. विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई होऊन नागरिकांनी ‘कोरोना’चे गांभीर्य लक्षात घेतले नसल्याचे चित्र सर्रास पहायला मिळत आहे. आता प्रशासनाने कठोर पाऊल उचलण्याची मागणी शहरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here