Home Breaking News प्रभाग क्र १७ नगर पालिका यवतमाळ येथे नवीन मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात..

प्रभाग क्र १७ नगर पालिका यवतमाळ येथे नवीन मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात..

123
0

यवतमाळ : भारतीय राज्यघटनेनं प्रत्येक नागरिकाला वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर मतदानाचा अधिकार दिला आहे. हा अधिकार बजाविण्यासाठी प्रत्येक नागरिकाला भारतीय निवडणूक आयोगातर्फे निवडणूक ओळखपत्र दिलं जातं. त्यानिमित्तानं प्रभाग क्र १७ येथे माजी नगरसेवक श्री.मोहनभाऊ देशमुख व स्वीकृत नगरसेविका सौ.रेखाताई कोठेकर यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली नवीन मतदार नोंदणी अभियानाला सुरुवात करण्यात आली आहे. या अभियानात ज्या युवक-युवतींचे १८ वर्ष पूर्ण झाले आहे. त्यांनी अंकुश पांडे यांना संपर्क करून आपले कागदपत्रे जमा करावे असे आवाहन करण्यात येत आहे. यावेळी माजी जिल्हाअध्यक्ष श्री.राजूभाऊ डांगे, नगरसेवक श्री.नितिन गिरी, श्री.विजय खडसे, नगरसेविका सौ.किर्तीताई राऊत, सौ.रिताताई धावतोडे, सौ.सुषमाताई राऊत, युवा मोर्चा चे श्री.बंटी श्रीवास, श्री योगेश पाटील, श्री.सुरज गुप्ता उपस्थित होते. या अभियानात यशस्वी करण्याकरिता श्री निकेतन ठाकरे, श्री.अमित क्षिरसागर, श्री.पराग सावरकर, श्री.अनुप खोडवे, आदी परिश्रम घेत आहे..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here