Home Breaking News यवतमाळात शेतकरी पुत्रांचा ट्रॅक्टर मोर्चा

यवतमाळात शेतकरी पुत्रांचा ट्रॅक्टर मोर्चा

29
0
दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला पाठिंबा , नवीन कृषी कायदे रद्दची मागणी
यवतमाळ : दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत कृषी विधेयक कायदा रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी शेतकरी पुत्र संघर्ष समितीने शुक्रवारी शहरातून ट्रॅक्टर मोर्चा काढत बसस्थानक चौकात डेरा आंदोलन केले.
दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी केली. मात्र, या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले. अखेर शुक्रवारी शहरातील आर्णी नाका परिसरात असलेल्या भगवान बिरसा मुंडा यांच्या पुतळ्याला अभिवादन करीत शेकडो शेतकरी पुत्रांच्या उपस्थितीत बसस्थानक चौकापर्यंत ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. त्यानंतर बसस्थानक चौकात डेरा आंदोलन करण्यात आले.
यावेळी किसान काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष देवानंद पवार, शेतकरी पुत्र संघर्ष समितीचे संयोजक तथा नगरसेवक नितीन मिर्झापुरे, चंद्रशेखर चौधरी, प्रा. प्रवीण देशमुख, अंकुश वानखडे, उमेश इंगळे, प्रदीप डंभारे, प्रकाश लंगोटे, श्रीकांत उर्फ गोलू मिरासे, अतुल राऊत, अरूण ठाकूर, घनश्याम अत्रे, आकाश चिंचोळकर, ललित जैन, अजय गावंडे, सुनील इंगोले, आकाश सोमोसे, गौरव अढाव, राहुल झाडे, प्रद्युम जावळेकर, सूरज खोब्रागडे, धीरज सोनटक्के, गोकुल खडसे, स्वप्निल मसराम, अभिनव वाटगुरे आदींसह शेकडो शेतकरी पुत्र उपस्थित होते.
मागण्या मान्य केल्याने ट्रॅक्टर मोर्चासह डेरा आंदोलन
यवतमाळ शेतकरी पुत्र संघर्ष समितीने दोन दिवसांपूर्वी दिल्लीतील शेतकऱ्यांच्या मागण्या तातडीने सोडवण्याची मागणी केली होती. मात्र प्रशासनाने या मागणीकडे दुर्लक्ष केल्याने शुक्रवारी ट्रॅक्टर मोर्चा काढत डेरा आंदोलन केले. पोलिसांनी बळाचा वापर करुन आम्हाला उचलले. नितीन मिर्झापुरे, नगरसेवक तथा संयोजक.
आज ट्रॅक्टर घेऊन निघाले उद्या दंडुके घेऊन निघतील
दिल्लीच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रातील शेतकरी पेटून उठला आहे. आज शेतकरी पुत्र ट्रॅक्टर घेऊन निघाले उद्या दंडुके घेऊन त्यांच्या घरापर्यंत जायला मागेपुढे पाहणार नाही. या भूमिकेत आम्ही त्यांना पाठिंबा देण्यासाठी आलो आहो. देवानंद पवार, प्रदेशाध्यक्ष किसान काँग्रेस.
काळा कायदा हटवल्याशिवाय आता शेतकरी पुत्र संघर्ष समिती स्वस्थ बसणार नाही
केंद्र सरकारने ५ जूनला एक काळा कायदा संपूर्ण भारतात लागू केला. या कायद्याच्या विरोधात पंजाब, हरियाणा, मध्यप्रदेश, राजस्थान मधला शेतकरी ताकतीने संघर्ष करतोय आहे. हे आंदोलन केवळ पंजाब, हरियाणामधील शेतकऱ्याचे नसून भारतातल्या तमाम शेती व्यवस्थेत राबणाऱ्या लोकांचं आहे. जोपर्यंत ही तिन्ही कायदे रद्द होणार नाही. तोपर्यंत हा शेतकरी पुत्र संघर्ष समिती स्वस्थ बसणार नाही.
– प्रा. प्रवीण देशमुख, यवतमाळ.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here