Home Breaking News जिल्ह्यात 39 नव्याने पॉझेटिव्ह ; 33 जणांना सुट्टी

जिल्ह्यात 39 नव्याने पॉझेटिव्ह ; 33 जणांना सुट्टी

45
0

यवतमाळ: गत 24 तासात जिल्ह्यात 39 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 33 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार गुरुवारी एकूण 380 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 39 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 341 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 293 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11848 झाली आहे. 24 तासात 33 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11178 आहे. तर जिल्ह्यात एकूण 377 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 115968 नमुने पाठविले असून यापैकी 115311 प्राप्त तर 657 अप्राप्त आहेत. तसेच 103463 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here