Home Breaking News पेट्रोल- डिझेल दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध

पेट्रोल- डिझेल दरवाढीचा शिवसेनेकडून निषेध

46
0

यवतमाळ: केंद्रीय मंत्री,भाजप नेते यांनी शेतकऱ्यांबद्दल केलेले वक्तव्य तसेच पेट्रोल- डिझेल दरवाढीविरोधात आज दत्त चौकात शिवसेनेकडून निषेध नोंदविण्यात आला.जमलेल्या शिवसैनिकांनी मोदी सरकारविरोधात प्रचंड घोषणाबाजी केली.
दिल्ली येथे सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामागे चीनचा हात असल्याचे खळबळजनक वक्तव्य केले होते त्यांच्या वक्तव्याचा विविध स्तरातून निषेध केल्या जात आहे.शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी दत्त चौक येथे एकत्र येत पेट्रोल ,डिझेल दरवाढ तसेच शेतकरी विरोधात दानवेंनी केलेल्या वक्तव्याचा कडाडून निषेध केला.यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,राजेंद्र गायकवाड,संतोष ढवळे यांच्यासह अन्य पदाधिकारी हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here