Home Breaking News टॅक्सी चालकाने केला महिलेचा खून प्रियकराने घातला डोक्यात दगड

टॅक्सी चालकाने केला महिलेचा खून प्रियकराने घातला डोक्यात दगड

15
0

 

यवतमाळ: पतीच्या माघारी अनैतिक संबंध ठेवणाऱ्या महिलेचा निर्घृण खून करण्यात आल्याची घटना उघडकीस आली आहे.वणी तालुक्यातील नांदेपेरा रोडलगत असलेल्या शेतशिवारात शुक्रवारी ही घटना घडली.
पतीच्या माघारी अनैतिक संबंध ठेवल्याने एका महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे.स्कुलबस चालविणाऱ्यासोबत प्रेमाचे सूत जुळले आणि या प्रेम कहाणीचा दुर्दैवी अंत झाला.

म्रूतक महिला वय वर्ष (३२) रा.वडोदा ता.वरोरा ची आहे.

आपल्या पत्नीचे परक्या व्यक्तीसोबत प्रेमप्रकरण सुरू असल्याचे कळताच पती- पत्नीमध्ये वाद झाला.त्यामुळे ती मागील एक वर्षांपासून वणीच्या पटवारी कॉलनीमध्ये आपल्या मुलांसह भाड्याने राहत होती.शुक्रवारच्या सकाळी सालगडी आपले बैल शेतातून काढत असताना त्याला जयाचा मृतदेह आढळून आला.याबाबत माहिती मिळताच वणीचे उपविभागीय पोलीस अधिकारी संजय पुजलवार यांनी तपासाची चक्रे हाती घेऊन प्रकरणाचा छडा लावला.आरोपी प्रियकर राहणार साखरा यास अटक करण्यात आली आहे.त्यानंतर त्याने खुनाचे प्रात्यक्षिक पोलिसांना करून दाखविले. वणी पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल करून त्यास अटक केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here