Home Breaking News प्रयत्नांना यश! अखेर शिवाजी महाराज उद्यानाचे नामकरण.

प्रयत्नांना यश! अखेर शिवाजी महाराज उद्यानाचे नामकरण.

64
0

यवतमाळ – शिवाजी नगर येथील शिवाजी गार्डन व शिवाजी मैदान हे अनेक वर्षांपासून यवतमाळ शहरात प्रसिद्ध आहे.पण या दोन्ही सार्वजनिक स्थळाला शिवाजी या नावाने ओळखले जात होते. या एकेरी नावाने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होत होता. या विषयाची दखल घेत श्री राजे बहुउद्देशिय संस्थेच्या वतीने यवतमाळ नगर पालिका व माजी बांधकाम सभापती तथा नगरसेवक श्री विजयजी खडसे यांना या दोन्ही स्थळांचे नाव छत्रपती शिवाजी महाराज उद्यान आणि छत्रपती शिवाजी महाराज मैदान असे करण्याकरिता निवेदन सादर केले होते. नगर पालिकेनी आम्ही दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन नगरसेवक श्री विजयजी खडसे यांनी या स्थळाच्या नामकरणासाठी प्रयत्न करुन अखेर नगर पालिकेची मंजुरी मिळून दिली.

*दिलेल्या निवेदनाची दखल घेतल्याबद्दल यवतमाळ नगर पालिका व माजी बांधकाम सभापती श्री विजयभाऊ खडसे यांचे जाहीर आभार..*

*विशेष सहकार्य*
माजी नगरसेवक श्री मोहनभाऊ देशमुख, स्वीकृत नगरसेविका सौ रेखाताई कोठेकर, नगरसेवक श्री चंदुभाऊ चौधरी, श्री नानाभाऊ गाडबैले व सर्व पत्रकार बंधू यवतमाळ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here