Home पुणे पालिका, जी.प निवडणुकीसाठी व्यवस्थापन समिति मध्ये मोहन जोशींची निवड !

पालिका, जी.प निवडणुकीसाठी व्यवस्थापन समिति मध्ये मोहन जोशींची निवड !

63
0

पुणे – राज्यामध्ये लवकरच होणाऱ्या पालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुकांसाठी काँग्रेस पक्ष जोमाने तयारीला लागला असून प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तरीय निवडणूक व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आली आहे.

राज्यात आगामी काही महिन्यात पालिका, महापालिका आणि जिल्हा परिषदांच्या निवडणुका होणार आहेत. या निवडणुका नियोजनबद्ध रितीने लढवल्या जाव्यात यासाठी प्रदेश काँग्रेसने ही व्यवस्थापन समिती स्थापन केली आहे. या समितीच्या उपाध्यक्षपदी प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा, मंत्री श्रीमती यशोमती ठाकुर यांची नियुक्ती करण्यात आली असून समितीत प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस, माजी आमदार मोहन जोशी, माजी मंत्री पद्माकर वळवी, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष तुकाराम रेंगे पाटील, प्रदेश काँग्रेस उपाध्यक्ष प्रकाश मुगदीया, प्रदेश काँग्रेस सरचिटणीस राजाराम पानगवाणे, इब्राहीम भाईजान, महेंद्र घरत, प्रविण देशमुख(यवतमाळ), प्रदेश काँग्रेस चिटणीस नाना गावंडे, रणजीत देशमुख (फलटण, सातारा) यांचा समावेश असून प्रदेश काँग्रेस सरचिटणीस गणेश पाटील यांची समन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here