Home Breaking News जिल्ह्यात 65 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 45 बरे , एकाचा मृत्यु

जिल्ह्यात 65 जण नव्याने पॉझेटिव्ह ; 45 बरे , एकाचा मृत्यु

44
0

यवतमाळ, दि. 13 : गत 24 तासात जिल्ह्यात 65 जण नव्याने पॉझिटिव्ह आले आहे तर एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला. मृतकामध्ये यवतमाळ शहरातील 60 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 45 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 583 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 65 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 518 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 295 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 11969 झाली आहे. 24 तासात 45 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11294 आहे. तर जिल्ह्यात एकूण 380 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 117203 नमुने पाठविले असून यापैकी 116541 प्राप्त तर 662 अप्राप्त आहेत. तसेच 104572 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here