Home Breaking News 33 नव्याने पॉझेटिव्ह ; 31 जण कोरोनामुक्त ; एकाचा मृत्यु

33 नव्याने पॉझेटिव्ह ; 31 जण कोरोनामुक्त ; एकाचा मृत्यु

63
0

यवतमाळ, दि. 16 : गत 24 तासात जिल्ह्यात 33 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एकाचा मृत्यु झाला आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 31 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
मृतकामध्ये …जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 301 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 33 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 268 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 289 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12082 झाली आहे. 24 तासात 31 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11410 आहे. तर जिल्ह्यात एकूण 383 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 118147 नमुने पाठविले असून यापैकी 117443 प्राप्त तर 704 अप्राप्त आहेत. तसेच 105361 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here