Home यवतमाळ झानभूमी येथे धम्मचक्क प्रवर्तन सुत्त शिबीर!

झानभूमी येथे धम्मचक्क प्रवर्तन सुत्त शिबीर!

54
0

यवतमाळ :मिशन समृद्ध भारत,प्रबुद्ध भारत अभियानांतर्गत मैत्रेय मेडिकल मेडिटेशन झानभूमी चापर्डाच्या वतीने २९ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत निवासी धम्मचक्क प्रवर्तन सुत्त शिबीर पार पडले या शिबिरात ५० साधकांना आपला सक्रिय सहभाग नोंदविला संपूर्ण विदर्भातून आलेल्या समता सैनिक दलाच्या सैनिकांनी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना त्यांच्या महापरिनिर्वाण दिनी मानवंदना देऊन शिबिराची सांगता केली महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध,सम्राट अशोक,तसेच बोधिसत्व डॉ बाबासाहेब आंबडेकर यांच्या स्वप्नातील समृद्ध भारत,प्रबुद्ध भारताच्या निर्माणासाठी मैत्रेय बोध संस्था विशेष प्रयत्नशील आहे नागपूर रोडवरील झानभूमी येथे आयोजित आठ दिवसीय निवासी शिबिरात बुद्धगया येथील बुद्धिस्ट मेडिटेशन सेंटरचे प्रमुख डॉ सत्यपाल यांची विशेष उपस्थिती होती धम्म चक्र परिवर्तन सुत्त शिबिराचा मुख्य उद्देश , फळ,विपाक प्राप्ती या विषयी त्यांनी यथायोग्य मार्गदर्शन करून शिबिरार्थींमध्ये प्रज्ञाभाव जागृत केला त्यानंतर महाथेरो डॉ खेमधम्मो यांनी आनापान आणि विपश्यनाचे जीवनात असलेले महत्व विशद केले जीवन जगण्याच्या कलेविषयी विस्तृत मार्गदर्शन करून त्यांनी उपस्थित साधकांना धम्म सेवा करण्याची प्रतिज्ञा दिली त्यानंतर मैत्रेय मेडिकल मेडिटेशन झानभूमीचे चिकित्सक झान भिक्कू मित्र डॉ बोधी अशोक यांनी ध्यान योग शिबिरात निरोगी आयुष्य कसे जगावे याविषयी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले सलग ८ दिवस चाललेल्या या शिबिरात १०० मिनिटांची ध्यानयोग साधना अवलंबून १०० वर्षे जगण्याच्या कौशल्यावर माहिती दिली ६ डिसेंबर रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकरांना समता सैनिक दलाने पथसंचलन करून अभिवादन केले त्यानंतर सामूहिक वंदना घेऊन शिबिराची सांगता करण्यात आली शिबिराला समता सैनिक दलाचे अध्यक्ष सुनील इंदूरकर,शक्य वाघमारे,गजानन डोंगरे, जिंदा भगत यांच्यासह महिला सैनिकांची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here