Home यवतमाळ जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला स्वीकारले : नगरसेवक जावेद अन्सारी

जिल्हा बँक निवडणुकीत मतदारांनी महाविकास आघाडीला स्वीकारले : नगरसेवक जावेद अन्सारी

36
0

यवतमाळ- नुकत्याच झालेल्या यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश प्राप्त केले आहे. जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅकेची तब्बल १३ वर्षानंतर निवडणूक पार पडली. या निवडणुकीत महा विकास आघाडीने एकतर्फी वर्चस्व गाजवले. बँकेच्या एकूण २१ पैकी तब्बल १६ जागांवर महाविकास आघाडीच्या उमेदवारांनी विजय संपादन केला. भाजपच्या पारड्यात दोन आणि एक समर्थित तसेच दोन अपक्ष उमेदवाराला विजय मिळविता आला. या निवडणुकीमध्ये महा विकास आघाडीला स्पष्ट बहुमत मिळाले. याआधी राज्यात झालेल्या शिक्षक आाणि पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने यश प्राप्त केले आहे. यावरून हे स्पष्ट झाले की महाविकास आघाडी महाराष्ट्रातील जनतेच्या पसंतीस उतरली असून त्यांचे कार्याबाबत लोक समाधानी आहेत. महाविकास आघाडीला बहुमत देवून मतदारांनी भाजपला एकप्रकारे नाकरले असल्याचे मत यवतमाळ नगर परिषदेचे जेष्ठ नगरेसवक तथा काँग्रेसचे नेता जावेद परवेज अंसारी यांनी व्यक्त केले आहे. येत्या ग्रामपंचायत निवडणुकीतही महाविकास आघाडीचे बाजी मारेल असा विश्ववासही जावेद अंसारी यांनी व्यकत केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here