Home Breaking News जिल्ह्यात 39 जण कोरोनामुक्त ; 40 नव्याने पॉझेटिव्ह!

जिल्ह्यात 39 जण कोरोनामुक्त ; 40 नव्याने पॉझेटिव्ह!

46
0

यवतमाळ, दि. 25 : वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 39 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. तर गत 24 तासात जिल्ह्यात 40 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.25) एकूण 476 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 40 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 436 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 338 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12476 झाली आहे. 24 तासात 39 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11744 आहे. तर जिल्ह्यात एकूण 394 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 121506 नमुने पाठविले असून यापैकी 120728 प्राप्त तर 778 अप्राप्त आहेत. तसेच 108252 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here