Home Breaking News शिरसगावात वन्यप्राण्यांचा हैदोस

शिरसगावात वन्यप्राण्यांचा हैदोस

162
0

उपाययोजना करण्याची नेर तालुक्यातील शेतक-यांची मागणी
महेश दिक्षीत :-

 


शिरसगाव पांढरी (ता. नेर जि. यवतमाळ) :- नेर तालुक्यातील शेतक-यांनी महागडी बियाणे खरेदी करून आपल्या शेतात पेरणी केली. अधुन-मधून कोसळणा-या पावसामूळे शेतातील सर्वच पिकांची स्थिती समाधानकारक आहे. मात्र, शेत शिवारालगत असलेल्या वनांमधील वन्यप्राण्यांकडून वाढीस आलेल्या पिकाला धोका निर्माण झाला आहे. या वण्यप्राण्यांचा त्वरीत बंदोबसत करण्याची मागणी शेतकऱ्यंकडून करण्यात आली आहे.
चालू खरिप हंगामामध्ये तालुक्यातील शेतक-यांनी आपल्या शेतामध्ये मूग, उडीद, सोयाबिन, कपाशी, तूर आदी महागडी बियाणे खरेदी करून पेरली. मृगनक्षत्रापासून अधुन-मधून कोसळणा-या पावसामुळे शेतातील पिके डोलू लागली आहेत. मुंग व उडीदाला शेंगाही लागत आहेत. याशिवाय अन्य पिकांचीही वाढ समाधानकारक असल्याने शेतकरी सुखावला आहेत. परंतु, शेतशिवारालगत असलेल्या जंगलामध्ये रोही, रानडूकर, माकड, हरीण यांचे मोठाले कळपे रात्रीच्या वेळेस शेतक-यांच्या शेतात जावून पिके खाऊन टाकीत आहेत. तसेच वन्यप्राणी शेतात जाताच पिके तूडवित जात असल्याने शेतक-यांचे मोठे नुकासन होण्याची शक्यता आहेत. परिणामी, तालुक्यातील शेतकरी धास्तीत आहेत. याबाबत वनविभागाने उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

कोरोनाच्या वाढत्या प्रादूर्भामूळे नागरिकांत दहशतीचे वातावरण आहे. अशा स्थितीत शेतक-यांनी परिश्रम घेवून पिके जगवली आहेत. कधी अस्मानी तर कधी सुलताानी संकटानी शेतकरी मेटाकूटीस आलेला आहे. आता मात्र, खरीप हंगामात आलेल्या पिकामुळे आशा पल्लवीत झाल्या आहेत. अशा स्थितीत वन्यप्राण्यांच्या बंदोबस्तासाठी तातडिने वनविभागाने उपाययोजना केल्या नाही तर वन्यप्राणीही पिकांना माती दिल्याशिवाय राहणार नाही.
– गजानन सारवे, शेतकरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here