Home Breaking News एका कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 60 नव्याने पॉझेटिव्ह : 24 तासात 47 जण...

एका कोरोनाबाधित मृत्युसह जिल्ह्यात 60 नव्याने पॉझेटिव्ह : 24 तासात 47 जण बरे!

38
0

यवतमाळ, दि. 31 : गत 24 तासात जिल्ह्यात 60 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यु झाला आहे. मृतकामध्ये यवतमाळ येथील 70 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 47 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि.31) एकूण 814 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 60 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 754 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 347 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12698 झाली आहे. 24 तासात 47 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 11950 आहे. तर जिल्ह्यात एकूण 401 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 124095 नमुने पाठविले असून यापैकी 123576 प्राप्त तर 519 अप्राप्त आहेत. तसेच 110878 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here