Home Breaking News भिमाल पेनठाणा वडगाव येथे गोंडी ध्वज स्थापना!

भिमाल पेनठाणा वडगाव येथे गोंडी ध्वज स्थापना!

45
0

यवतमाळ -कोया पुनेम गोटुल समिती व क्रांतिसूर्य बिरसा मुंडा बहुउद्देशीय खेळ व क्रीडा मंडळाच्या वतीने दि.३० डिसेंबरला पहांदि पारी कुपार लिंगो गोंडी ध्वज स्थापना, वृक्षरोपण तसेच कोया पुनेम गोटुल समिती चे २०२१ कॅलेंडर प्रकाशन व सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार सोहळा भिमाल पेनठाणा दांडेकर ले आऊट जाम रोड वडगाव येथे घेण्यात आला.
या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माजी शालेय शिक्षण मंत्री तथा उपाध्यक्ष विधानसभा म.रा.वसंतराव पुरके हे होते.तर अध्यक्षस्थानी कोया पुनेम गोटुल समिती चे अध्यक्ष प्रल्हादराव सिडाम हे होते.तर प्रमुख वक्ते म्हणून नारायणराव मरस्कोल्हे,यवतमाळ तर प्रमुख पाहुणे म्हणून राजु केराम नगरसेवक, डॉ.दिपक नैताम, वसंतराव कंगाले, प्रेमलता पुरके,स्नेहलता सिडाम,सुरेश कन्नाके, गुलाब मेश्राम, दिलीप सेडमाके,बाळु वट्टी,गुलाबराव कुडमेथे,पवनकुमार आतराम,प्रा.विठ्ठल आडे,प्रा.किरण अनाके,हे होते.
सर्वप्रथम भुमक विरसेन मडावी व राहुल खंडाते, सारीका खंडाते यांच्या हस्ते पहांदि पारी कुपार लिंगो यांच्या फोटोंचे गोंगो करुन गोंडी ध्वजारोहण करण्यात आले.भिमाल पेनठाना परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण व कोया पुनेम गोटुल समिती चे २०२१कॅलेडर प्रकाशन करण्यात आले.
प्रास्ताविका मध्ये भिमाल पेन चा सामाजिक कार्याचा इतिहास स्नेहलता प्र.सिडाम यांनी सांगितला.
शिक्षण व्यवस्था ही गोटुलमध्ये ५ हजार वर्षांपूर्वी गोंडी संस्कृती मध्ये होती व निसर्ग संस्कृती संवर्धक पहांदि पारी कुपार हे त्यांचे जनक होते असे प्रतिपादन प्रमुख वक्ते तिरुमाल नारायणराव मरस्कोल्हे,यवतमाळ यांनी केले.
यावेळी मधुकरराव सयाम,लक्ष्मणराव कुळसंगे, सुरेश मोकाशे,महादेव उईके,मारोती कुमरे,शरदराव उईके,वसंतराव मडावी,कवडुजी चांदेकर, श्रीकृष्ण वाढीवा, हनुमंत कुडमेथे,विष्णुपंत मसराम, पुंडलिक वरमे,, शामराव सराटे या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते शालनारळ देऊन करण्यात आला.
तसेच एनटीए परिक्षेत मराठी विषयात उत्तीर्ण रोहीणी विष्णुपंत मेश्राम व नागपूर येथे एमबीबीएस ला नंबर लागल्यामुळे कु.पुजा विजय मडावी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.
आजच्या आधुनिक काळात शैक्षणिक कार्यात अग्रेसर असण्यासाठी समाजात गोटूल व्यवस्था स्थापित करणे आवश्यक आहे.असे उद्घाटक म्हणून वसंतराव पुरके यांनी सांगितले.तर समाजातील बांधवांनी शिक्षित होऊन समाजकार्य अंगीकृत करावे तेव्हाच समाजाचा विकास होईल असे अध्यक्षनिय भाषणात प्रल्हादराव सिडाम यांनी व्यक्त केले.
गोंडीयन समाज बांधवांनी गोंडी धर्म गुरू पहांदि पारी कुपार लिंगो यांचे तत्वज्ञान समजुन समाजामध्ये प्रसार करण्याचे आवाहन करण्यात या वेळी करण्यात आले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन किशोर उईके सर तर आभार बाबाराव कुळसंगे सर यांनी केले.
या कार्यक्रमासाठी संजय मडावी,बाबाराव उईके,प्रकाश मडावी,अरुण पोयाम, रमेश केराम, राजेश सयाम, गणेश पेंदाम, पुरुषोत्तम मडावी,भारत मडावी, भिमराव मरस्कोल्हे,गजानन कोटनाके, सुरेश कोडापे, सुरेश वेलादे, अरविंद केराम, रमेश कुडमेथे,ढिंगाबर वाटे, भानुदास मडावी,विलास टेकाम,दिनेश धुर्वे,विलास केराम, निशांत सिडाम, अरविंद मडावी, संजय मेश्राम, वासुदेव वट्टी, विठ्ठलराव तोडसाम, राजेंद्र सिडाम, नारायण जुगनाके, शंकर कोटनाके,व्यकटेश उईके, राजेश मडावी,दिनेश कुमरे,विजय वट्टी,ज्ञानेश्वर उईके,केशव कुमरे,अजय उईके, दिलीप उईके,दामोधर उईके,विजय मडावी, सुशील सोयाम, सुरेश तोडासे,विनोद उईके,यांनी परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here