Home Breaking News फ्री मेथोडिस्ट मातृचर्च मध्ये नवीन वर्षाचे स्वगत !

फ्री मेथोडिस्ट मातृचर्च मध्ये नवीन वर्षाचे स्वगत !

21
0

यवतमाळ : संपूर्ण जगामध्ये 1 जानेवारी म्हणून नवीन वर्ष साजरा केला जातो. यवतमाळ शहरामध्ये फ्री मेथडिस्ट मातृ चर्च येथे सुद्धा नवीन वर्षाची भक्ती घेण्यात आली.त्यावेळेस कोरोनाच्या नियमांचे पालन करून नवीन वर्षांच्या निमित्ताने संदेश, गाणे गाऊन स्तुती,आराधना करण्यात आली.
नवीन वर्षांमध्ये संपूर्ण देशवासीयांसाठी,सर्व ख्रिस्ती मंडळांसाठी, डॉक्टर्स,नर्सेस,पोलीस यंत्रणेसाठी आणि यवतमाळ ख्रिस्ती बांधव यांच्या आरोग्यासाठी व संरक्षणासाठी आणि कोरोनाला आळा घालण्यासाठी व त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मध्यस्तीची प्रार्थना सुरेश ढोके यांनी केली.
नवीन वर्षामध्ये नवनविन संकल्प करून देवाला न आवडणाऱ्या गोष्टी लक्षात घेऊन किंवा मंगळ गोष्टी याचा त्याग करून नवीन वर्षाची सुरुवात कशा पद्धतीने करायची याचा संदेश फादर रेव्ह.दिलीप दिवसे यांनी फ्री मेथडिस्ट मातृ चर्च यवतमाळ येथील ख्रिस्ती बांधवांना दिला.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आणि त्यावर आळा घालण्यासाठी शासनाने दिलेल्या नियमांचे काटेकोर पालन करून चर्चमध्ये शारीरिक अंतर ठेऊन,मास्क वापरणे आणि सॅनिटायझर यांचा वापर करून नवीन वर्षाची भक्ती साजरी करण्यात आली.यात मिलींदकुमार मॅसन,प्रवीण कळसकर,दत्ता दळवी,कैलास अचमेलवार, शीतल ढोके आणि इतर कार्यकारी सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here