Home Breaking News बोधगव्हान येथे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले सन्मान दिन.

बोधगव्हान येथे महात्मा ज्योतिराव फुले व सावित्रीबाई फुले सन्मान दिन.

25
0

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा बोधगव्हाण केंद्र पांढरी पंचायत समिती यवतमाळ येथे 1 जानेवारीला शाळा बंद शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत टाकाऊ पासून टिकाऊ साहित्य तसेच इंग्रजी ,विज्ञान ,गणित, भाषा इत्यादी विषयाचे दालन तयार करण्यात आले . या दालनाचे यवतमाळ पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी श्रीकृष्ण खोब्रागडे यांच्या हस्ते covid-19 पार्श्‍वभूमीवर संपूर्ण दक्षता घेऊन उद्घाटन करण्यात आले .या प्रसंगी केंद्रप्रमुख प्रकाश झाटे, गजानन देऊळकर तसेच मुख्याध्यापक ज्ञानेश्वर नाकाडे , प्रदीप खंडाळकर , सुरेश नरवाडे ,भाऊ दरणे , पारधी उपस्थित होते. शाळा बंद पण शिक्षण सुरू या उपक्रमांतर्गत सर्व विषयाचे दालन निर्मिती करून वेळेचा सदुपयोग याकरिता मुख्याध्यापिका सौ सुनीता जतकर व सहाय्यक शिक्षिका श्रीमती प्रांजली डेहनकर यांच्या कल्पकतेतून व नियोजनातून या दालनाची निर्मिती झाली व इतरांपुढे एक आदर्श निर्माण केला .याकरिता डायटचे विषय सहाय्यक निलेश जयसिंगकार , साधन व्यक्ती कु वैशाली गायकवाड ,अमित गावंडे, कु वैशाली खरवडे यांचे मोलाचे सहकार्य व योगदान लाभले याबाबत सर्वांनी कौतुक करून शुभेच्छा दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here