Home Breaking News मार्निंग वाॅक ग्रुप तर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!

मार्निंग वाॅक ग्रुप तर्फे सावित्रीबाई फुले यांना अभिवादन!

17
0

यवतमाळ: पुंडलिक बाबा अपार्टमेंट दर्डा नगर यवतमाळ येथे स्त्री शिक्षणाच्या प्रणेत्या सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रा. मानेकर होते तर प्रमुख अतिथी म्हणून वसंत नाल्हे, शरद ढोबळे, शशिकांत खडसे, प्रविण भोयर, महेश देशकर, इत्यादी मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमांमध्ये सर्वप्रथम सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते हारार्पण करण्यात आले. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांचे जीवनकार कार्य मांडतांना त्यांनी स्त्री शिक्षणासाठी घेतलेले कष्ट, काव्य फुले हा कविता संग्रह, प्लेगच्या साथीत केलेले सामाजिक कार्य व त्यातच झालेला मृत्यू या विषयावर मान्यवरांनी माहीती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक व संचलन देविदास डंभे यांनी केले तर आभार अशोक काळमोरे यांनी मानले. यावेळी रवीन्द्र निमट,दिपक पिसे, भूषण वानखेडे,दिपक निचळ,सुधिर अडेकर, दिलीप डगवार, देविदास भुरे, दिपक कैथवास, महेश कडू, विश्राम कुंभलकर,उत्तमराव टाके, प्रमोद डवले,राजू गुल्हाने, चंद्रकांत नारनवरे, हरिदास दुबे, दिलीप नाल्हे, इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here