Home Breaking News जिल्ह्यात 43 नव्याने पॉझेटिव्ह, 37 जण कोरोनामुक्त.

जिल्ह्यात 43 नव्याने पॉझेटिव्ह, 37 जण कोरोनामुक्त.

30
0

यवतमाळ, दि. 3 : गत 24 तासात जिल्ह्यात 43 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 37 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार रविवारी एकूण 1291 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 43 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 1248 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 361 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12809 झाली आहे. 24 तासात 37 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12046 आहे. तर जिल्ह्यात एकूण 402 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 126280 नमुने पाठविले असून यापैकी 125619 प्राप्त तर 661 अप्राप्त आहेत. तसेच 112810 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here