Home Breaking News जिल्ह्यात एका मृत्युसह 47 जण नव्याने पॉझेटिव्ह , 40 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात एका मृत्युसह 47 जण नव्याने पॉझेटिव्ह , 40 जण कोरोनामुक्त

23
0

यवतमाळ, दि. 4 : गत 24 तासात जिल्ह्यात एका मृत्युसह 47 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकामध्ये कळंब तालुक्यातील 54 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 40 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 4) एकूण 247 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 47 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 200 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 367 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 12856 झाली आहे. 24 तासात 40 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12086 आहे. तर जिल्ह्यात एकूण 403 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 126411 नमुने पाठविले असून यापैकी 125866 प्राप्त तर 545 अप्राप्त आहेत. तसेच 113010 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here