Home Breaking News शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन कार्य करीत राहू- संजय देरकर

शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन कार्य करीत राहू- संजय देरकर

33
0
तिन्ही शिवसेना जिल्हाप्रमुखांच्या उपस्थितीत केली घोषणा!

यवतमाळ: सामाजिक कार्यात अनेक वर्षापासून कार्यरत आहे. आता शिवसेनेचा भगवा खांद्यावर घेऊन सामाजिक कार्यात अग्रेसर राहू, अशी ग्वाही आज वणी विभागातील राजकीय नेते तसेच यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचे नवनिर्वाचीत उपाध्यक्ष संजय देरकर यांनी दिली. ते यवतमाळ येथे आयोजित पत्रकार परीषदेत बोलत होते. याप्रसंगी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख पराग पिंगळे,विश्वास नांदेकर,राजेंद्र गायकवाड व हरिहर लिंगनवार उपस्थित होते.

मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीपुर्वी जिल्हयाचे पालकमंत्री तसेच शिवसेना नेते संजयभाऊ राठोड यांची भेट घेतल्याचे संजय देरकर यांनी सांगीतले. या भेटीनंतर मारेगाव तालुक्यातून संजय देरकर यांना शिवसेनेकडून उमेदवारी घोषीत झाली. संजय देरकर हे मोठया फरकाने निवडणूकीत विजयी झाले आहे. आज शिवसेनेच्या वतीने संजय देरकर यांनी आपले उपाध्यक्ष पदासाठी नामांकन दाखल केले. उपाध्यक्ष पदी निवड झाल्यानंतर आज संजय देरकर यांनी गळयात भगवा शेला घालून यवतमाळात पत्रकारांशी संवाद साधला. लवकरच शिवसेना नेते संजयभाऊ राठोड तसेच तिन्ही शिवसेना जिल्हाप्रमुख यांच्यासमवेत मुंबईला जाऊन पक्षप्रमुख व मुख्यमंत्री उध्दवजी ठाकरे यांची भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगीतले. सध्या ग्रामपंचायत तसेच लवकरच नगर पंचायत च्या निवडणुका होऊ घातल्या आहे. यामध्ये संजय देरकर हे सक्रीय सहभागी राहणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख पराग पिंगळे यांनी सांगीतले. संजय देरकर यांचा शिवसेना प्रवेश झाल्याचे जिल्हाप्रमुख राजेन्द्र गायकवाड यांनी घोषीत केले. विश्वास नांदेकर यांनी सुध्दा संजय देरकर यांच्यासमवेत समन्वय ठेऊन शिवसेना आणखी बळकट करणार असल्याची ग्वाही दिली. संजय देरकर यांच्या शिवसेना प्रवेशाने पक्ष आणखी बळकट होईल असा विश्वास तिन्ही जिल्हाप्रमुखांनी व्यक्त केला. याप्रसंगी उपजिल्हाप्रमुख हरीहर लिंगनवार हे सुध्दा उपस्थित होते.

पक्षाच्या सशक्तीकरणाला प्राधान्य

संजय देरकर यांच्या पक्षप्रवेशाने शिवसेना आणखी बळकट झाली आहे.पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे व जिल्ह्यामध्ये ना संजयभाऊ राठोड तसेच महाविकास आघाडीच्या नेत्रृत्वात मध्यवर्ती सहकारी बॅंकेच्या निवडणूकीत आम्ही यश संपादन केले. आता उपाध्यक्ष पद आमच्याकडे आले आहे. पक्षाच्या सशक्तीकरणाला आम्ही नेहमीच प्राधान्य देत आलो. पुढेही विविध निवडणूकीच्या माध्यमातून आम्ही जिल्हयात शिवसेनेची ताकद वाढविण्यासाठी प्रयत्नशील राहणार आहो.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here