Home Breaking News जिल्ह्यात तीन मृत्युसह 74 नव्याने पॉझेटिव्ह , 48 जण कोरोनामुक्त

जिल्ह्यात तीन मृत्युसह 74 नव्याने पॉझेटिव्ह , 48 जण कोरोनामुक्त

81
0

यवतमाळ, दि. 10 : नागरिकांच्या बेजबाबदार वागण्यामुळे जिल्ह्यात कोरोनाचा विळखा आणखी घट होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळेच शासन आणि प्रशासनाच्या मार्गदर्शक सुचनांचे पालन करणे आवश्यक आहे. गत 24 तासात जिल्ह्यात तीन मृत्युसह 74 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 48 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
मृतकांमध्ये यवतमाळ शहरातील 58 वर्षीय पुरुष, पांढरकवडा शहरातील 60 वर्षीय आणि पांढरकवडा तालुक्यातील 73 वर्षीय पुरुषांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार आज (दि. 10) एकूण 480 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 74 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 406 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 449 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13201 झाली आहे. 24 तासात 48 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12342 आहे. तर जिल्ह्यात एकूण 410 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 129066 नमुने पाठविले असून यापैकी 128275 प्राप्त तर 791 अप्राप्त आहेत. तसेच 115074 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here