Home यवतमाळ प्रभाग क्र १७ मध्ये जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन।

प्रभाग क्र १७ मध्ये जिजाऊ माँ साहेब यांना अभिवादन।

67
0
यवतमाळ – प्रभाग क्र १७ मधील शिवाजी नगर येथे स्वराज्याच्या प्रेरणास्रोत राजमाता जिजाऊ माँ साहेब यांना विनम्र अभिवादन करण्यासाठी मंगळवार १२ जानेवारी त्यांच्या जयंती निमित्त शिवाजी नगर येथे श्री राजे बहुउद्देशिय संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी जय जिजाऊ जय शिवराय या जय घोषात जयंती साजरी केली. कोरोना परिस्थितीचा विचार करता साध्या सोप्या पद्धतीने जिजाऊ माँ साहेब यांच्या जयंतीचे आयोजन करण्यात आले असून हा काळ लवकरात लवकर जावा अशी प्रार्थना या निमित्ताने केली. शिवाजी नगर येथे भव्य प्रतिमा ठेवण्यात आली. सकाळी १० वाजता जिजाऊ माँ साहेब यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले.यावेळी अध्यक्ष श्री अंकुश पांडे, उपाध्यक्ष श्री मंगेश धोटे, सचिव श्री सनी खोडवे, श्री पराग सावरकर, श्री अमित क्षिरसागर, श्री प्रथमेश देशपांडे, श्री अनुप खोडवे, श्री अल्पेश चिकटे, श्री शरद माहूरे, श्री अभिलाष पांडे, श्री निरंजन निकडे, श्री प्रथमेश बत्तलवार, श्री कपिल मस्के आदी उपस्थित होते..

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here