Home Breaking News कॉंग्रेसचे आमदार डॉ वजाहत मिर्जा यांचा वाहनाचा अपघात!

कॉंग्रेसचे आमदार डॉ वजाहत मिर्जा यांचा वाहनाचा अपघात!

291
0

यवतमाळ – येथील जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष आमदार डॉ. वजाहत मिर्झा यांच्या वाहनाला शुक्रवारी यवतमाळ-नागपूर रोडवर रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अपघात झाला, त्यात त्यांच्या आईला किरकोळ दुखापत झाली. शनिवार येथे काँग्रेसचे आंदोलन आहे. त्यासाठी  मिर्झा नागपूर ला जात होते, यवतमाळ शहराबाहेरील ‘चाचा का ढाबा’ जवळ विरुद्ध दिशेने येणाऱ्या इंडिकाने मिर्झा यांच्या वाहनाला जबर धडक दिली. या अपघातात दोन्ही वाहनाचे मोठे नुकसान झाले.  इंडिका चालक मद्य प्राशन करून असल्याचे बोलले जाते. अपघात झाला, मात्र सर्व जण सुरक्षित असल्याचे डॉ. मिर्झा यांनी ‘द रिपब्लिक न्यूज’ ला सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here