Home Breaking News एका कोरोनाबाधित मृत्युसह 45 नव्याने पॉझेटिव्ह , 49 जण कोरोनामुक्त

एका कोरोनाबाधित मृत्युसह 45 नव्याने पॉझेटिव्ह , 49 जण कोरोनामुक्त

17
0

यवतमाळ, दि. 18 : गत 24 तासात जिल्ह्यात 45 जण नव्याने पॉझेटिव्ह आले असून एका कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यु झाला आहे. मृतकामध्ये आर्णि तालुक्यातील 55 वर्षीय पुरुषाचा समावेश आहे. तर वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 49 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार सोमवारी एकूण 274 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 45 जण नव्याने पॉझेटिव्ह तर 229 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 425 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 13679 झाली आहे. 24 तासात 49 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 12838 आहे. तर जिल्ह्यात एकूण 418 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 132500 नमुने पाठविले असून यापैकी 132235 प्राप्त तर 315 अप्राप्त आहेत. तसेच 118506 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here