Home Breaking News ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

ट्रॅक्टरच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

81
0

मारेगाव : प्रतिनिधी

मारेगाव वरुण खडकी बुरांडा येथे दुचाकीने   जाणाऱ्या इसमास  ट्रँक्टरने मागावुन जबर धडक दिल्याने दुचाकीस्वार जागीच ठार झाल्याची घटना मारेगाव राज्य महामार्गावरील करणवाडी शिवारात  सोमवारला रात्री सात वाजताचे दरम्यान घडली. बळीराम हरी गुंजेकर 48 असे मृतकाचे नाव आहे दरम्यान , ट्रँक्टर चालकाने घटनास्थळावरुन पोबारा केला.

ट्रँक्टर क्रमांक एम.एच.29 सी.4514 हे वाहन मारेगाव वरुण करनवाडी कडे भरधाव वेगाने जात होते.त्यासमोर दुचाकी क्रमांक एम.एच.29- 8455 ही खडकी बुरांडा कडे जात असतांना ट्रँक्टर ने दुचाकीला मागावुन जबर धडक दिली.यात दुचाकीस्वार बळीराम गुंजेकर  (48) रा.बुरांडा(खडकी) हे जागीच ठार झाले.अपघात होताच ट्रँक्टर चालकाने घटनास्थळावरुंन पोबारा केला.परिणामी मृतकाच्या मागे  ,पत्नी ,चार मुली व एक मुलगा असा आप्तपरिवार आह घटनेच्या तपास ठाणेदार जगदीश मंडलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आनंद अचलेवार व  बंटी मेश्राम करीत आहे.

—-–———

बातमी व जाहिराती करीता संपर्क

संपादक 

जितेश नावडे

+91 83292 67128

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here