Home Breaking News Nsui यवतमाळ जिल्हा तर्फे शेतकरी आन्दोलनाला मिळालेल्या हिंसक वळणा बद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन...

Nsui यवतमाळ जिल्हा तर्फे शेतकरी आन्दोलनाला मिळालेल्या हिंसक वळणा बद्दल जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर..

18
0

दिल्ली येथे देशभरातील शेतकरी ज्या प्रमाणे आपल्या मागण्यांसाठी आंदोलन करीत आहेत त्या आंदोलनाला काल हिंसक वळण मिळाले. मागील दोन महिन्यांपासून ज्याप्रमाणे केंद्रीय भाजप सरकार ‘थकाओ और भगाओ’ च्या नीतीवर या शेतकऱ्यांना कुठल्याही ठोस निर्णयावर न नेता त्याला डावळत आहे हे अत्यंत चिंतादायक आहे.
व्यापाऱ्यांच्या हातात शेतीप्रधान देशाच्या मोठ्या प्रतिनिधीत्वाला जर असे हक्कांपासून वंचित करत असेल तर हे नक्कीच निंदनीय आहे. 175 शेतकरी बांधव या आंदोलनात मृत्युमुखी पडले तरीही या सरकारला जाग आली नाही आणि अखेर काल प्रजासत्ताक दिनी या आंदोलनाला या ज्याप्रमाणे हिंसक वळण मिळाले त्याचा यवतमाळ जिल्हा NSUI जाहीर निषेध करते.
‘शेतकर्यांच्या या आंदोलनाला ज्या प्रमाणे हे हिंसक वळण मिळाले त्याच्या निषेधार्थ आज NSUI यवतमाळ जिल्हा कडून जिल्हाधिकारी, यवतमाळ यांना निवेदन देण्यात आले. यावेळी सन्मानीय विरोधी पक्षनेते चंदुभाऊ चौधरी, NSUI जिल्हाध्यक्ष कौस्तुभ शिर्के, नगरसेवक जावेद अन्सारी, बबलु देशमुख,जाकीर खान,सौ वैशाली ताइ सवई,पल्लवीताई रामटेके,छोटूभाऊ पावडे, लोकेश इंगोले, NSUI जिल्हा महासचिव सनी आगळे, प्रद्युमन जवळेकर, संकेत रननावरे, ईश्वर येरके, सुमेध दोडके, अतुल येडके, ओम पडघन, विनोद चव्हान, आशिष किनकर NSUI पदाधिकारी व कार्यकर्ते
हे हजर होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here