Home Breaking News जिल्हास्तरीय पिंचाक सिलाट अजिंक्यपद स्पर्धा..

जिल्हास्तरीय पिंचाक सिलाट अजिंक्यपद स्पर्धा..

35
0

यवतमाळ: राज्य पिंचाक सिलाट असोसिएशन व पिंचाक सिलाट असोसिएशन, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सबज्युनिअर जुनिअर आणि वरिष्ठ गट राज्य व राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड चाचणी जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नेहरू स्टेडियम, जिल्हा क्रिडा संकुल, गोधनी रोड, यवतमाळ येथे करण्यात आले आहे.
जिल्हा, राज्य तसेच राष्ट्रीय स्पर्धेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्या 12 ते 14, 15 ते 17 आणि 17 ते 35 या वयोगटातील यवतमाळ जिल्ह्यातील सबजुनिअर, जुनिअर, व वरिष्ठ गटातील खेळाडूंनी जिल्हास्तरीय निवड चाचणी स्पर्धेसाठी उपस्थित रहावे, असे आवाहन पिंच्याक सिलाट असोसिएशन चे सचिव मनोज झाडे यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here