Home Breaking News राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट निवड चाचणी..

राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट निवड चाचणी..

167
0

यवतमाळ : राज्य पिंच्याक सिलाट असोसिएशन व पिंच्याक सिलाट असोसिएशन, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सबज्युनिअर जुनिअर आणि वरिष्ठ गट राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड चाचणी,जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नेहरू स्टेडियम, जिल्हा क्रिडा संकुल, गोधनी रोड, यवतमाळ येथे करण्यात आले होते.
स्पर्धेच्या उदघाटन कार्यक्रम प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष पद माजी जिल्हापरिषद उपाध्यक्ष मा. श्री. बाळासाहेब मांगुळकर यांनी भुषविले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणुन नगरसेवक श्री नितिनभाऊ मिर्झापुरे, नगरसेविका पल्लवीताई रामटेके, अद्विता अरुणोदय मल्टिसिटी निधी बँक चे श्री.जितेश नावडे, एस.एस.टी.एम. कॉलेज चे संचालक श्री. संदीपभाऊ तेलगोटे, अमेचर तेंग सू डो स्पोर्ट्स च्या अध्यक्षा सौ. अश्विनीताई झाडे, पिंच्याक सिलाट असोसिएशन चे अध्यक्ष श्री. विनय बोंदाडे तसेच असोसिएशन चे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
सूत्रसंचालन श्री. राजुभाऊ गिरी यांनी केले. तसेच आभार प्रदर्शन पिंच्याक सिलाट असोसिएशनचे सचिव श्री. मनोज झाडे सरांनी केले.
स्पर्धेच्या समारोपीय कार्यक्रमाला स्कुल ऑफ स्कॉलर्स चे शारीरिक शिक्षक श्री. संजय कोल्हे सर, कराटे प्रशिक्षक श्री.खमसे सर, तायक्वांदो प्रशिक्षक श्री. लकी खत्री सर, ईश्वर देशमुख सैनिक शाळेचे प्रशिक्षक श्री. विजय सालोडे सर, पिंच्याक सिलाट असोसिएशन चे उपाध्यक्ष श्री. अजय दांडेकर सर यांच्या हस्ते विजयी खेळाडुंना मेडल व प्रशस्तीपत्र देऊन सन्मानित कऱण्यात आले.
स्पर्धेच्या यशस्वीतेकरिता राहुल झाडे,सुदर्शन चव्हाण,सतीश चव्हाण,शिवप्रसाद माने,प्रतीक भोपे,प्रतीक बोरकर, प्रसाद मेश्राम, नवीन शाह,सागर बावरे यांचे सहकार्य लाभले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here