Home Breaking News दोन मृत्युसह जिल्ह्यात 54 जण पॉझेटिव्ह , 33 कोरोनामुक्त

दोन मृत्युसह जिल्ह्यात 54 जण पॉझेटिव्ह , 33 कोरोनामुक्त

39
0

यवतमाळ, दि. 10 : गत 24 तासात जिल्ह्यात दोन मृत्युसह 54 जण नव्याने पॉझेटिव्ह आले आहेत. मृतकांमध्ये कळंब तालुक्यातील 75 वर्षीय पुरुष तर दारव्हा तालुक्यातील 67 वर्षीय महिलेचा समावेश आहे. तसेच वसंतराव नाईक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या आयसोलेशन वॉर्ड, विविध कोव्हीड केअर सेंटर आणि कोव्हीड हेल्थ सेंटरमध्ये भरती असलेल्या 33 जणांनी कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागातर्फे प्राप्त अहवालानुसार बुधवारी एकूण 527 रिपोर्ट प्राप्त झाले. यापैकी 54 जण नव्याने पॉझेटिव्ह आले तर 473 जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आले. सद्यस्थितीत जिल्ह्यात 486 ॲक्टीव्ह पॉझेटिव्ह आहे. तसेच आतापर्यंत एकूण पॉझेटिव्ह रुग्णांची संख्या 14896 झाली आहे. 24 तासात 33 जण कोरानामुक्त झाल्यामुळे जिल्ह्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 13974 आहे. तर जिल्ह्यात एकूण 436 मृत्युची नोंद आहे.
सुरवातीपासून आतापर्यंत 146264 नमुने पाठविले असून यापैकी 145874 प्राप्त तर 390 अप्राप्त आहेत. तसेच 130978 नागरिकांचे नमुने आतापर्यंत निगेटिव्ह आल्याचे जि.प. आरोग्य विभागाने कळविले आहे.
००००००००

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here