Home Breaking News स्पोर्ट्स मार्शल आर्टस् रेगुलर ट्रेनिंग सेंटर यवतमाळ च्या खेळाडूंची राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट...

स्पोर्ट्स मार्शल आर्टस् रेगुलर ट्रेनिंग सेंटर यवतमाळ च्या खेळाडूंची राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धेसाठी निवड..

53
0

यवतमाळ : राज्य पिंच्याक सिलाट असोसिएशन व पिंच्याक सिलाट असोसिएशन, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने सबज्युनिअर जुनिअर आणि वरिष्ठ गट राज्यस्तरिय स्पर्धेसाठी निवड चाचणी,जिल्हास्तरीय स्पर्धेचे आयोजन 1 फेब्रुवारी रोजी सकाळी 10 वाजता नेहरू स्टेडियम, जिल्हा क्रिडा संकुल, गोधनी रोड, यवतमाळ येथे करण्यात आले होते. या स्पर्धेमधे स्पोर्ट्स मार्शल आर्ट रेगुलर ट्रेनिंग सेंटर यवतमाळच्या खेळाडूंनी घवघवीत यश प्राप्त केले.
यामध्ये *वरिष्ठ वजन गटात*
भुमिका गोडे (सुवर्ण )
प्रतिक भोपे (सुवर्ण)
सुदर्शन चव्हाण(सुवर्ण )
सतीश चव्हाण(सुवर्ण )
*जुनिअर वजन गटात*
आचल गोडे (सुवर्ण )
भाग्यश्री सोनटक्के (सुवर्ण)
भुमिका जेरूरकर (सुवर्ण)
सौरभ झुंगे (सुवर्ण)
*सबज्युनिअर वजन गटात*
जान्हवी पाटील (सुवर्ण)
श्रावणी लोखंडे (सुवर्ण)
यशश्री कुडमेथे (सुवर्ण)
वीर जाधव (सुवर्ण)
तनुश्री जयस्वाल (सुवर्ण)
निर्भया मनवर (रजत)
अनुष्का देवतळे (रजत)
भुवनेश्वेरी गिरी (रजत)
सानिध्य वानखडे (कास्य)
अंश धवणे (कास्य)
असे पदक प्राप्त केले असुन निवड झालेल्या खेळाडूंची निवड मुंबई येथे होणाऱ्या 11वी राज्यस्तरीय पिंच्याक सिलाट स्पर्धा 2021 साठी करण्यात आली आहे.
विद्यार्थी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई-वडीलांना तसेच पिंच्याक सिलाटअसोसिएशन, यवतमाळचे सचिव मनोज झाडे सरांना देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here